हल्ला करणाऱ्या शत्रू पेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहावे : Kosare Maharaj

(1) My Facebook Page          (2) My YouTube Channel        (3) My Twitter Account   (4) Instagram Account

हल्ला करणाऱ्या शत्रू पेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहावे





                      माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरुन सिद्ध होते. मोठेपणाचं गमक केवळ स्वतः मोठं होण्यात नसून इतरांना आपल्याप्रमाणं मोठं करण्यात आहे ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो.ज्यांना गरजाच उरत नाहीत तेच खरे धनवान असतात. माणसाला दरिद्री बनवितात त्या इच्छा संपत्ती जशी बाहेरची असते तशी आंतरिकही असते. ही अंतर्यामीची संपत्ती प्राप्त झाली की आणखी काही मिळण्याजोगं शिल्लकच राहात नाही. मनुष्य खऱ्या अर्थानं मोठा सम्राट बनतो.



            कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा कधी हि बाकी ठेवू नये. कर्ज वेळेवर फेडले नाही तर व्याजाचा बोजा वाढत जातो. शत्रूला पूर्णतः नष्ट केले नाही तर तो कालांतराने पुन्हा आक्रमण करण्याचा धोका असतो. आणि रोगाचा पुरता बीमोड केला नाही तर आजारपण पुन्हा उद्भवत असतो .



          माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणे हे त्यांच्या शहाणपणाचे पहिले लक्षण होय शहाणा माणूस कोणत्याही वेळी सजग असतो. आपले सामर्थ्य कशात आहे यांच्या आधी आपले नेमके दोष कोणते याची त्याला स्पष्ट जाणीव असते. या जाणीवेतून तो आपले दोष सुधारतो आणि मगच यशस्वी होतो. म्हणूनच स्वतःच्या दोषांची जाणीव होण्याच्या क्षणापासून शहाणपणाकडे वाटचाल सुरू होते.



           निर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे . भित्रा माणूस कधीही नीतिमान होऊ शकत नाही. असीम धैर्यातूनच नीतीचा जन्म होतो. जो धाडसी माणूस आहे तो सर्व अनुकूल प्रतिकूल प्रसंगांना विलक्षण आत्मविश्वासाने सामोरा जातो. अशा माणसाला जीव वाचविण्यासाठी खोटं बोलावं, अन्यायाचा आश्रय घ्यावा याचा कधीही मोह होत नाही. याउलट भित्रा माणूस कधीही इतक्या नीतीने जगू शकत नाही.



        हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहावे.छुप्या ढोंगापेक्षा उघड उघड धोके केव्हाही कमी धोकादायक असतात. आपला उघड शत्रू आपल्या विरोधात कोणत्या हालचाली करत आहे याची कल्पना आपल्याला सहजपणे येते पण आपल्याला स्तुतीच्या नशेत बेहोष करून टाकणाऱ्या आपल्या ढोंगी मित्राचा अंतस्थ कावा ओळखणं फार अवघडच असतं.



          बुद्धिमत्ता ही माणसाला लाभलेली सर्वोत्तम देणगी होय माणूसही प्राणीच आहे. मात्र तरीही तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण इतर प्राणी सहजभावाने जगतात तर माणूस जगताना बुद्धिमत्तेचा वापर करतो. जगताना कार्यकारण भावाची जाणीव असल्याने माणसाने अपूर्व विविधांगी प्रगती साधलेली दिसते. बुद्धिमत्तेशिवाय हे शक्य नसतं.



        ज्याचे स्वतःवर नियंत्रण नाही तो स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही.स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्याचे हक्क हे जबाबदारीच्या मर्यादांमध्ये बांधलेले असतात. स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी मुळात जबाबदारीची, संयमपूर्ण वागणुकीची जाणीव असावी लागते. स्वतःवर नियंत्रणे घालू न शकणारा माणूस स्वातंत्र्याऐवजी स्वैराचारानेच वागेल.



        प्राप्त झालेले वैभवदेखील आळशी माणसाला टिकविता येत नाही कधी कधी नशीब, दैव उजळलेल्या आळशी माणसालाही सहजगत्या संपत्ती मिळते. पण अगदी विनासायास मिळालेल्या या संपत्तीला वाढवणे हे खरं तर कोणालाही जमणारं काम आळशी माणसाला जमत नाही. कारण त्यासाठी बुद्धी, कौशल्य व शारीरिक कष्ट सोसावे लागतात. दैवदुर्विलास असा की, आळशीपणामुळे त्यांच्याने संपत्ती वाढवणे तर सोडाच पण टिकवणेसुद्धा शक्य होत नाही.



         दयेसारखा दुसरा धर्म नाही शांतीसारखं तप नाही. संतोषासारखं सुख नाही. तृष्णेसारखा रोग नाही. दयेसारखा दुसरा धर्म नाही. दया हे सद्गुणांच माहेर आहे. सर्व धर्मांचं पोषण दयारूपी नदीच्या पात्रावरच होत असतं. म्हणून जीवात जीव असेपर्यंत दयेची कास सोडू नका.



        आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्म-सुधारणा ज्याच्यापाशी आहेत त्यानं जग जिंकलं असं समजावं. या जगात कोणाची तरी सत्ता कोणावर तरी चालणारचं. मग आपणच आपल्यावर ताबा का ठेवू नये? दुसऱ्याला आपण फसवू शकतो. स्वतः स्वतःस फसवणं अवघड असतं. म्हणूनच आत्मजयी तो विश्वजयी संयम सुधारणा व ज्ञान यांच्या सहकार्याने स्वतःवर विजय म्हणजे एक प्रकारे सर्वांवर विजय असतो.


कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍

Post a Comment

0 Comments