स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की , लोक तुमचे चाहते झाले पाहिजे. : Kosare Maharaj

(1) My Facebook Page          (2) My YouTube Channel        (3) My Twitter Account   (4) Instagram Account

स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की लोक तुमचे चाहते झाले पाहिजे 

: Kosare Maharaj 




            मित्र वाढले नाहीत तरी चालेल पण शत्रूची वाढ तरी करू नका.माणूस हा को कोणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे.म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.फांद्या तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेष बदलून स्वभाव पालटत नाही, आसक्ती मुळापासून तोडावी लागते. स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की ,


             लोक तुमचे चाहते झाले पाहिजे.खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.माशांसाठी हवा आणि पाणी जितके आवश्यक आहे तितकेच मानवी जगण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे.आत्मविश्‍वास असल्याशिवाय माणसाला यश मिळू शकत नाही. आत्मविश्वास ही अशी उर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीला आव्हाने, अडचणी आणि यशासह येणार्‍या अडथळ्यांना तोंड देण्यास धैर्य देते.अपमान व गोळ्या दातांनी चावता येत नाहीत.त्या सरळ पोटात गिळणेच चांगले.जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही.


        आपला जन्म गर्दीत उभा राहिला नाही, तर गर्दी करायला झालाय.कोणी कौतुक करो व टिका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी.दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका.चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे.आलेले अपयश विसरा,येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा.मी नंतर करेल असा कोणताच श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही.जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही.लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून दाखवा.जिंकण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात.जिंकणारे जिंकण्यासाठी, खूप वेळा हारलेले असतात.निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी बलवान बनवतात.




कोसारे महाराज :- संस्थापक व राष्ट्रीय अध्य्क्ष

मानव हित कल्याण सेवा संस्था नागपुर

 

हमारी नई वेबसाइट में आपका स्वागत हैं

https://www.kosaremaharaj.com

You May Also Like 

--

Kosare Maharaj

Founder, National President

Manav Hit Kalyan Seva Sanstha 


Contact : 9421778588

Web: https://www.kosaremaharaj.com


Follow me on 👍

Post a Comment

0 Comments